वायू प्रदूषणामुळे आजारी पडल्याची अथवा थेट मृत्यू झाल्याची कोणतीही ठोस आकडेवारी उपलब्ध नसल्याची माहिती आज सरकारनं लोकसभेत आज दिली. श्वसनाचे आजार आणि त्याच्याशी संबंधित इतर आजारामध्ये प्रदूषण हे महत्त्वाचं कारण असल्याचं आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी सभागृहात विचारलेल्या एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं.
खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक त्या सर्व ठोस उपाययोजना सरकार वचनबद्ध असल्याचं माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉक्टर एल. मुरुगन यांनी आज सांगितलं. अशा खोट्या बातम्यांमुळे लोकशाही कमकुवत होण्याची तसंच समाजामध्ये दरी निर्माण होण्याची शक्यता असल्याचंही राज्यसभेत एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना डॉ. मुरुगन यांनी सांगितलं.