नायजेरियाच्या ईशान्येकडील बोर्नो राज्यातील एका स्थानिक बाजारात काल रात्री झालेल्या स्फोटात २० जण ठार झाले असून अनेकजण जखमी झाले आहेत. स्फोटानंतर या भागात गोळीबार करण्यात आल्याची माहिती बोर्नो पोलिसांनी दिली आहे. बोको हराम दहशतवादी गटानं हा स्फोट घडवून आणल्याचंही पोलिसांनी म्हटलं आहे. बोर्नो राज्यातल्या कोंडाउगा शहरातल्या कापुरी येथील बाजारात हा स्फोट झाला. त्यानंतर पोलिसांनी संपूर्ण राज्यात संचारबंदी घोषित केली आहे.
Site Admin | August 2, 2024 2:37 PM | nizeria