डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

November 11, 2024 7:56 PM | Nagpur | Nitin Gadkari

printer

काटोल ते नागपूर रस्त्याच्या कामाला मंजूरी – मंत्री नितीन गडकरी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूरात कटोल इथं महायुतीचे उमेदवार चरणसिंग ठाकूर यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. मेटमांजरा आणि भागातलं ८ किलोमीटरचं वनविभागानं अडवून ठेवलेल कामासाठी १५० कोटी रूपये वाढवून काटोल ते नागपूर रस्त्याचं कामाला मंजूरी दिली असल्याचं त्यांनी म्हटलं. यामुळे नागपूरवरून अमरावतीला जाण्यासाठी पर्यायी मार्ग सुरु झाल्याचं त्यांनी सांगितलं.

 

काटोल, नारखेड, वरुड, मोरशी या भागात कमी होत असलेल्या पाण्याच्या पातळीसाठी जलसंवर्धनाचा उपक्रम राबवून, प्रत्येक विहरीवर सोलर पंप लावण्याची योजना सरकारनं आणली असल्याचं त्यांनी सांगितलं. निर्यात खर्चात घट करण्यासाठी संत्र्यांची निर्यात ही सिंधी रेल्वेच्या द्वारे बांगलादेशात करण्याच्या योजनेला सरकारने सुरूवात केली आहे. यामुळे ट्रकद्वारे संत्री निर्यात करण्याच्या खर्चात घट होणार असल्याचं त्यांनी म्हटलं. याचप्रमाणे कापड ही निर्यात करण्याचा सरकारचा मानस असल्याचं ते म्हणाले.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा