डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

विमा, निवृत्तीवेतन आणि शेअर बाजार हे देशाच्या आर्थिक विकासाचे 3 महत्त्वपूर्ण पैलू- नितीन गडकरी

विमा, निवृत्तीवेतन आणि शेअर बाजार हे तीन स्तंभ देशाच्या आर्थिक विकासाचे तीन महत्त्वपूर्ण पैलू असून या माध्यमातून आलेली गुंतवणूक उद्योगव्यवसायांना समृद्ध करु शकते, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. नागपूर इथं झालेल्या गुंतवणूकदार प्रशिक्षण परिषदेत ते काल बोलत होते.

 

आर्थिक वाढीसाठी आर्थिक साक्षरता महत्वाची असून यामध्ये लोकांना जागृत करण्याची आवश्यकता आहे, वित्त पुरवठ्याचे स्रोत आणि तंत्रज्ञानापेक्षाही विश्वासाहर्ता अधिक महत्वाची असते, असं गडकरी म्हणाले. देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी आपल्याला प्रत्येक क्षेत्रात सर्वांगीण प्रगती करावी लागेल, असं त्यांनी सांगितलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा