विदर्भातील ११ जिल्ह्यांमधील दूध संकलन हे प्रतिदिवशी ५ लाख लिटर असून ते पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली यांच्या तुलनेत खूपच कमी आहे. ही परिस्थिती महाराष्ट्र पशु विज्ञान आणि मत्स विज्ञान विद्यापीठ तसंच अकोल्यातली डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं पशुवैद्यकीय तंत्रज्ञांच्या मदतीनं विदर्भात किमान २० लीटर प्रतिदिन दूध देणारे १० हजाराच्यावर पशुधन विकसित करावे असं आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल केले. नागपूरमध्ये इंडियन डेअरी असोसिएशनच्यावतीनं आयोजित दुग्ध व्यवसायावरील राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते.
Site Admin | August 18, 2024 12:10 PM | Nitin Gadkari