‘मुंबई महानगर क्षेत्रः जागतिक आर्थिक केंद्र म्हणून विकास’ या निती आयोगाच्या अहवालाचं आज मुंबईत प्रकाशन होणार आहे. यावेळी MMRDA अर्थात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधीकारण आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम यांच्यात सामंजस्य करार करण्यात येणार आहे. मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृहात दुपारी साडेतीन वाजता हा कार्यक्रम होईल. यात वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे संस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष क्लॉस श्वाब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
Site Admin | September 12, 2024 1:50 PM | निती आयोग | मुंबई महानगर क्षेत्र
‘मुंबई महानगर क्षेत्रः जागतिक आर्थिक केंद्र म्हणून विकास’ या निती आयोगाच्या अहवालाचं आज मुंबईत प्रकाशन
