नीती आयोगाच्या संपूर्णता अभियानाला देशभरात सुरुवात झाली आहे. येत्या ३० सप्टेंबरपर्यंत देशातल्या ५०० तालुक्यात हे अभियान राबवलं जाणार आहे. महाराष्ट्रातल्या २७ तालुक्यांचा या अभियानात समावेश झाला आहे. संपूर्णता अभियानामध्ये गर्भवती महिलांची प्रसुतीपूर्व काळजी आणि त्यांना पोषक आहार, मधुमेह आणि उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींची तपासणी आणि उपचार, माती परीक्षण आणि बचतगटांना मिळणारा फिरता निधी, शाळेतील विद्यार्थ्यांचा संक्रमण दर, तसंच १० वी आणि १२ वीमधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी यावर प्राधान्यानं भर दिला जाणार आहे.
Site Admin | July 6, 2024 2:53 PM | NITI Aayog | Sampoornata Abhiyan