भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार वर्ष २०३०पर्यंत दुप्पट करणं सहज शक्य असल्याचं मत नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बीव्हीआर सुब्रह्मण्यम यांनी व्यक्त केलं आहे. ते आज नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. २०४७ पर्यंत भारत सर्वाधिक तरुण लोकसंख्येचा देश बनेल आणि दरडोई उत्पन्न २० हजार डॉलर्सच्या आसपास असेल असं भाकित त्यांनी वर्तवलं. हवामान बदलाच्या समस्येच्या पार्श्वभूमीवर हवामानविषयक तंत्रज्ञान आत्मसात करण्याची संधी भारताला आहे असं ते म्हणाले. हरित अर्थव्यवस्थेचा पर्याय स्वीकारण्याची गरज असून २०७० पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचं उद्दिष्ट गाठण्याच्या दृष्टीने नीती आयोग कार्यरत आहे असं ते म्हणाले.
Site Admin | September 18, 2024 8:03 PM | NITI Aayog