नीति आयोगानं काल २०२३-२०२४ साठीचा SDG इंडिया इंडेक्स अर्थात शाश्वत विकास उदिष्ट निर्देशांक जारी केला. नीति आयोगाचे मुख्य कार्यकारी आधिकारी बीव्हीआर सुब्रह्मण्यम आणि नीतिआयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा निर्देशांक जारी करण्यात आला. जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असूनही भारत शाश्वत विकास उद्दिष्टांकडे प्रगती करत आहे, २०१८ मध्ये ५७ आणि २०२०-२१ मध्ये ६६ वरून हा निर्देशांक २०२३-२४ मध्ये ७१वर गेला आहे. देशातली सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची प्रगती मोजण्यासाठी हा निर्देशांक वापरला जातो.