डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

September 12, 2024 8:02 PM | NITI Aayog

printer

भविष्यात साथीच्या रोगांचं निवारण करण्यासाठी निती आयोगाचा अहवाल जाहीर

भविष्यात साथीच्या रोगांचं निवारण करणारी रचनात्मक चौकट तयार करण्यासाठी निती आयोगानं स्थापन केलेल्या तज्ञ गटानं आज आपला अहवाल जाहीर केला. साथीचा मुकाबला करण्यासाठीची सज्जता आणि तत्काळ प्रतिसादासाठी कृतींची माहिती देणारा हा अहवाल आहे. कोविड १९ च्या अनुभवानंतर साथीच्या काळात काय करता येईल याविषयीचे मार्गदर्शनही या अहवालात केलं आहे. प्रभावी व्यवस्थापनासाठी साथीच्या काळात पहिले १०० दिवस महत्त्वाचे असतात असं या अहवालात म्हटलं आहे. साथीच्या रोगाची चाचपणी, चाचण्या, उपचारांची अंमलबजावणी या पातळीवर तज्ञ गटानं  अहवालात सूचना केल्या आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा