डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

निती आयोगाकडून गिअर शिफ्ट चॅलेंज या हॅकेथॉन उपक्रमाची घोषणा

देशात माल वाहतुकीसाठी शून्य कार्बन उत्सर्जन ट्रक वाहनांच्या अवलंबित्वाला चालना देण्याच्या उद्देशानं निती आयोगानं गिअर शिफ्ट चॅलेंज या हॅकेथॉन उपक्रमाची घोषणा केली आहे. इलेक्ट्रिक ट्रकच्या वापरामुळे आपल्याला कार्बत उत्सर्जनात घट साध्य करण्याची, हवेच्या गुणवत्तेत सुधारणा घडवून आणण्याची आणि ऊर्जा सुरक्षेत वृद्धी साध्य करत मोठं परिवर्तन घडवून आणण्याची संधी मिळेल असं निती आयोगानं म्हटलं आहे. त्यादृष्टीनंच अशा ट्रक वाहनांचा वापर करण्याच्या प्रयत्नांना गती देण्याकरता, तसंच अशा ट्रकच्या वापरताल्या समस्या आणि त्यावरच्या संशोधनपूर्ण उपाययोजना सुचवणारं व्यावसायिक प्रारुप तयार करता यावं या उद्देशानं हे हॅकेथॉन राबवलं जाईल. हॅकेथॉनमधल्या स्पर्धकांनी तयार केलेल्या व्यावसियाक प्रारुपांमधल्या उपाययोजनांना वस्तुनिष्ठ आणि परिणामकारक स्वरुप प्राप्त व्हावं यासाठी, या स्पर्धकांना तज्ञ व्यक्तींचं मार्गदर्शनही उपलब्ध करून दिलं जाणार आहे. ही हॅकेथॉन दोन फेऱ्यांमध्ये होणार आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा