डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

December 18, 2024 2:47 PM | NITI Aayog

printer

भारताचा प्रवास जागतिक आणि देशांतर्गत आव्हानांच्या टप्प्यात अविश्वसनीयपणे वेगवान वाढीचा आहे – नीती आयोग

दहाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था ते आज पाचव्या स्थानापर्यंतचा भारताचा प्रवास जागतिक आणि देशांतर्गत आव्हानांच्या टप्प्यात अविश्वसनीयपणे वेगवान वाढीचा आहे, असं मत नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन के. बेरी यांनी व्यक्त केलं आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. नीती आयोग, कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कले आणि इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट रिसर्च यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय ‘भारताच्या बहुविध संक्रमणांवर आंतरराष्ट्रीय कार्यशाळेबद्दल त्यांनी माहिती दिली. सर्वात उत्तम अर्थव्यवस्था आपल्याला व्हायची असेल तर गुंतवणूक वाढली पाहिजे, या संदर्भात या कार्यशाळेत चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. वातावरणातील बदल आणि नागरिकीकरण ही महत्वाची आव्हानं असताना आमची भूमिका ही पुढचे दहा वर्ष कसे असतील ही असल्याचं बेरी यांनी नमूद केलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा