विकसित भारतासमोरच्या आव्हानांची चर्चा करण्यासाठी मुंबईतल्या इंदिरा गांधी विकास संशोधन संस्थेत दोन दिवसीय परिषद पार पडली. यावेळी विकसित भारतासमोरची आव्हानं, त्यांना मिळणारं अर्थसहाय्य, या अर्थसहाय्याचं स्त्रोत याविषयी चर्चा झाल्याची माहिती नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी यांनी दिली. या चर्चांचा उपयोग धोरण निश्चितीसाठी होईल, असं ते म्हणाले. भारतासमोर आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात सुधारणा करणं हे मोठं आव्हान असल्याचं कॅलिफोर्निया विद्यापीठातले प्राध्यापक डोनाल्ड हन्ना म्हणाले. कामाच्या ठिकाणी स्री – पुरुष समानता, उत्पन्न वाढीसाठी तंत्रज्ञानाचा उपयोग आणि नैसर्गिक स्रोतांच्या वापरावरचे निर्बंध हटवणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं.
Site Admin | December 17, 2024 8:35 PM | NITI Aayog