केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल राजस्थानमधील जैसलमेर इथं राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अर्थमंत्र्यांसोबत अर्थसंकल्पपूर्व चर्चा केली. या बैठकीत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी, गोवा, हरियाणा, जम्मू-काश्मीर, मेघालय आणि ओडिशा या राज्यांचे मुख्यमंत्री आणि अरुणाचल प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणाचे उपमुख्यमंत्री; अर्थमंत्री तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 2025-26 या आर्थिक वर्षाच्या अनुषंगाने केंद्रीय अर्थसंकल्पासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या. यावेळी सीतारामन म्हणाल्या की व्यापक आर्थिक वातावरण, कर संकलनातील वाढ आणि कार्यक्षमतेमुळे 15 व्या वित्त आयोगांतर्गत गेल्या 45 महिन्यांत राज्यांना हस्तांतरित केलेला निधी 60 महिन्यांत हस्तांतरित केलेल्या निधीपेक्षा जास्त आहे. केंद्राने भांडवली गुंतवणुकीसाठी राज्यांना विशेष सहाय्य योजना 2024-25 अंतर्गत सुमारे 30,000 कोटी रुपयांची अतिरिक्त रक्कम ‘अनटायल्ड फंड’ म्हणून वाटप केली आहे. राज्य सरकारांना कोणत्याही क्षेत्रातील भांडवली मालमत्तेच्या निर्मितीवरील खर्चात आणखी वाढ करण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो.
Site Admin | December 21, 2024 9:07 AM | #rajsthan | FM Nirmala Sitharaman