सरकारनं किसान क्रेडिट कार्ड योजनेचा विस्तार मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि इतर क्षेत्रांमध्ये करून त्यात वैविध्य आणल्याचं दरभंगा इथं झालेल्या पतपुरवठा संपर्क कार्यक्रमात बोलताना निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. केंद्रीय अर्थसंकल्प आता महिलाकेंद्री ऐवजी महिलाप्रधान झाला असून येत्या काही वर्षांत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्यास याची देशाला मदत होईल, असं त्या यावेळी म्हणाल्या. बचत गटांना सक्षम करण्यासाठी प्रशिक्षण आणि कौशल्य वाढीच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या ड्रोन दीदी प्रकल्पांचाही त्यांनी उल्लेख केला. या कार्यक्रमादरम्यान सीतारामन यांनी विविध योजनांच्या 49,000 हून अधिक लाभार्थ्यांना सुमारे 1 हजार 388 कोटी रुपयांचं कर्ज वाटप केलं. सीतारामन यांच्या बिहार दौऱ्याचा उद्या शेवटचा दिवस असून मधुबनी जिल्ह्यातील झंझारपूर इथं दुसऱ्या पतपुरवठा संपर्क कार्यक्रमात त्या सहभागी होतील.