केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आजपासून दोन दिवसांच्या बिहार दौऱ्यावर आहेत. मधुबनी जिल्ह्यातल्या क्रेडिट आऊटरीच कार्यक्रमात त्या सहभागी होणार आहेत. या दौऱ्यादरम्यान विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांशी त्या संवाद साधतील. दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी त्या स्वयं अर्थसहाय्यता गट, रोजगाराभिमुख योजना आणि अन्य क्षेत्रातल्या लाभार्थ्यांना एक हजार कोटी रुपयांहून अधिकची ऋण स्वीकृत्री पत्रं वितरित करणार आहेत.
Site Admin | November 30, 2024 2:39 PM | Bihar | Finance Minister Nirmala Sitharaman