प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात भारताच्या बँकिंग क्षेत्रात विशेषतः सार्वजनिक बँकांमध्ये आमूलाग्र बदल झाले, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा पैसा भ्रष्टाचारासाठी वापरला जात असल्याचा कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा आरोप तथ्यहीन असल्याचं सीतारामन यांनी स्पष्ट केलं आहे. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा विशिष्ट उद्योगपतींसाठी एटीएम म्हणून वापर केला जात असे, अशीही टीका सीतारामन यांनी समाजमाध्यमांवरच्या संदेशात केली आहे. मोदी सरकारच्या काळात ५४ कोटी जनधन खाती उघडण्यात आली आहेत आणि विविध योजनांच्या अंतर्गत ५२ कोटी तारणविरहित कर्जप्रकरणं मंजूर झाल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
Site Admin | December 12, 2024 1:48 PM | निर्मला सीतारामन | प्रधानमंत्री | बँकिंग क्षेत्र
प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात भारताच्या बँकिंग क्षेत्रात आमुलाग्र बदल झाल्याचं निर्मला सीतारामन यांचं प्रतिपादन
