सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांचं मूल्यमापन त्यांच्याकडे येणार्या निधीवरुन केलं जावं, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी म्हटलं आहे. त्या आज पुण्यात बँक ऑफ महाराष्ट्रच्या नव्वदाव्या स्थापनादिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. पायाभूत सुविधांसाठी निधी, औपचारिक बँकिंग सेवांमध्ये प्रवेश विस्तारणं, आणि सर्व नागरिकांसाठी सर्वसमावेशक विमा सुरक्षा सुनिश्चित करण्यावर त्यांनी भर दिला.
सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका अटल पेन्शन योजना आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना यांसारख्या सरकारी विमा योजनांची अंमलबजावणी करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असल्याचं त्या म्हणाल्या.