डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

DD-Robocon India 2024 स्पर्धेत निरमा विद्यापीठ विजयी

प्रसारभारती आणि भारतीय तंत्रशिक्षण संस्था दिल्ली यांच्या वतीनं आयेजित DD-Robocon India 2024 ही स्पर्धा निरमा विद्यापीठानं जिंकली आहे. या स्पर्धेत पुण्यातील पिंपरी-चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय, प्रथम उपविजेते, तर एमआयटी विश्वशांती विद्यापीठानं दुसऱ्या उप-विजेतेपदावर आपली मोहोर उमटवली.

 

दोन दिवस नवी दिल्लीतील त्यागराज मैदानावर या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. विजेता संघ आता व्हिएतनाममधील क्वांगनिन्ह इथं आंतरराष्ट्रीय आशिया-प्रशांत प्रसारण संघटनेच्या 2024 मध्ये भारताचं प्रतिनिधित्व करेल. 45 महाविद्यालयं, विविध शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठांमधील 750 विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा