केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आज नवी दिल्ली इथं देशातले आघाडीचे पुरातत्वशास्त्रज्ञ, संग्रहालय शास्त्रज्ञ आणि इतिहासकारांची बैठक घेतली. भारताच्या प्राचीन सागरी इतिहासाचं दस्तावेजीकरण आणि उत्सवीकरण करण्याबाबत या बैठकीत भर देण्यात आला. भारताचा सागरी इतिहास हा केवळ भूतकाळाचा वारसा नाही, तर तो भविष्यासाठीही मार्गदर्शक दीपस्तंभ आहे, असं सोनोवाल या बैठकीत म्हणाले.
Site Admin | October 5, 2024 8:42 PM | sarbanand sonwal
नवी दिल्लीत देशातले आघाडीचे पुरातत्वशास्त्रज्ञ, संग्रहालय शास्त्रज्ञ आणि इतिहासकारांची बैठक
