नायजेरियात झाम्फारा या राज्यात लष्कराच्या हवाई हल्ल्यात १६ जण ठार झाले असून अनेक जण जखमी झाले आहेत. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, मरण पावलेल्यांमध्ये स्थानिक सतर्क गटातल्या सदस्यांचा समावेश होता. गुन्हेगारांचा माग काढून परतत असताना गुन्हेगारी टोळ्या जात असल्याचा गैरसमज झाल्याने हा हल्ला करण्यात आला. हा हल्ला झुर्मी आणि मार्डुन भागातल्या दहशतवादी टोळ्यांवर केला गेला होता. या हल्ल्यातल्या मृत्युंविषयी अधिक तपास करत असल्याची माहिती नायजेरियाच्या हवाई दलाने दिली आहे.
Site Admin | January 13, 2025 8:30 PM | Nigeria
नायजेरियात झाम्फारा राज्यात लष्कराच्या हवाई हल्ल्यात १६ जण ठार
