नायजेरियात एक इंधनाच्या टँकरचा स्फोट होऊन ९४ जण मारले गेले तर ५० जण जखमी झाले. टँकरचालकाचं वाहनावरचं नियंत्रण गेल्यामुळे हा टँकर कलंडला होता. त्यातलं इंधन जमा करायला जमलेल्या जमावातल्या बहुसंख्यांचा मृतांमध्ये समावेश आहे. नायजेरियातले इंधनाचे भाव सामान्यांच्या आवाक्याबाहेचे आहेत त्यामुळे असे अपघात अनेकदा घडतात. सप्टेंबरमध्येही इंधनाचा टँकर कलंडून झालेल्या अपघातात ५९ जण मारले गेले होते.
Site Admin | October 16, 2024 8:43 PM | Nigeria
नायजेरियात इंधनाच्या टँकरचा स्फोटात ९४ जणांचा मृत्यू, ५० ठार
