नायजर मध्ये काल दुपारी एका मशिदीवर झालेल्या हल्ल्यात ४४ जण मृत्युमुखी पडले तर १३ जण जखमी झाले. हल्ल्याचं ठिकाण हे नायजर, बुर्किना फासो आणि माली या तीन देशांच्या सीमावर्ती भागात असून, पश्चिम आफ्रिकेतलं अल-कायदा आणि इस्लामिक स्टेट या दहशतवादी गटांचं केंद्र म्हणून ओळखलं जातं. इस्लामिक स्टेटशी संबंधित ईआयजीएस या दहशतवादी गटानं हा हल्ला केल्याचा आरोप स्थानिक प्रशासनानं केला आहे.
Site Admin | March 22, 2025 8:10 PM | Nigeria
नायजरमध्ये मशिदीवर झालेल्या हल्ल्यात ४४ जणांचा मृत्यू, तर १३ जण जखमी
