एनआयएफटी अर्थात नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी या संस्थेनं विकसित केलेल्या, भारतातल्या पहिल्या एआय आणि ईआय आधारित फॅशन फोरकास्टिंग मंचाबद्दल माहिती देण्यासाठी मुंबईत आज वार्ताहर परिषद घेतली. वस्त्रोद्योग आयुक्त रूप राशी आणि एनआयएफटीच्या संचालक डॉ. शर्मिला राव यावेळी उपस्थित होत्या. वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सहकार्यानं तयार झालेला हा मंच कृत्रिम प्रज्ञा आणि भावनिक प्रज्ञेच्या आधारे भारतात पुढच्या काळात फॅशनचा कल कसा असेल, याचं भाकीत करू शकतो. याद्वारे भारतातले वस्त्रोद्योग आणि संबंधित उद्योगांना सक्षम करणं हा या मंचाचा उद्देश आहे.
Site Admin | January 9, 2025 1:30 PM | Fashion Technology | NIFT
एनआयएफटी संस्थेची मुंबईत पत्रकार परिषद
