डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

September 10, 2024 6:51 PM | NIA

printer

लाओस इथल्या लॉन्ग चेंग कंपनीच्या सीईओ विरोधात एनआयएची कारवाई

एनआयए, अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेनं आज लाओस इथल्या लॉन्ग चेंग कंपनीच्या सीईओ विरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावरची मानवी तस्करी आणि सायबर फसवणूक प्रकरणी आरोपपत्र दाखल केलं. एनआयए मुंबईनं या वर्षी अटक केलेला सुदर्शन दराडे, या प्रकरणातला प्रमुख आरोपी आहे. एनआयए नं दराडे याच्या मोबाईल मधून मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी स्वरूपाचं साहित्य जप्त केलं असून या प्रकरणातल्या आणखी दोन फरार आरोपींबाबतचे तपशील  गोळा केले आहेत. यात एका परदेशी नागरिकाचा समावेश आहे. दराडे याच्या  लाओस मधल्या  लॉन्ग चेंग या कंपनीच्या माध्यमातून तरुणांना नोकरीचं अमिश दाखवून त्यांची फसवणूक केली जात होती असं तपासामधून उघड झालं आहे.