डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

January 5, 2025 7:39 PM | NIA

printer

NIA:पॉप्युरलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेच्या सज्जाद आलमला अटक

राष्ट्रीय तपास संस्था, एनआयएनं, फुलवारी शरीफ दहशतवादी मॉड्युल प्रकरणात पॉप्युरलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेच्या सज्जाद आलम या मुख्य आरोपीला काल अटक केली. पॉप्युरलर फ्रंट ऑफ इंडिया ही संघटना  दहशतवादी कारवायांना रसद पुरवत असल्याचा आरोप असून या संघटनेवर सरकारनं बंदी घातली आहे.

 

बिहार मधल्या पटना इथल्या एन आय ए च्या विशेष न्यायालयानं आलम याच्याविरोधात अटक वॉरंट जारी केलं होतं. तो दुबईहून नवी दिल्ली विमानतळावर येताच त्याला अटक करण्यात आली. आलम दुबईतून यूएई, कर्नाटक आणि केरळ मधल्या गुन्हेगारी नेटवर्कच्या मदतीनं बिहारमधल्या पीएफआय च्या सदस्यांना बेकायदेशीररीत्या  निधी पुरवत असे.  हा निधी दहशतवादाला प्रोत्साहन देण्यासाठी वापरला जात असे. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा