राष्ट्रविरोधी कारवायांशी संबंधित प्रकरणात एन आय ए म्हणजेच राष्ट्रीय तपास संस्थेनं आज महाराष्ट्रासह जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश, आसाम आणि दिल्लीत २२ ठिकाणी छापे टाकले. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या कारवायांशी संबंध असल्याच्या संदर्भात ही छापेमारी सुरु आहे. छत्रपती संभाजी नगर, जालना आणि मालेगावमध्येही हे छापे सुरू आहेत. एनआयएनं छत्रपती संभाजीनगर मधून तीन जणांना तर जालन्यातून एकाला ताब्यात घेतल्याचं वृत्त आहे.
Site Admin | October 5, 2024 8:44 PM | एन आय ए
एनआयएचे महाराष्ट्रासह जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश, आसाम आणि दिल्लीत २२ ठिकाणी छापे
