राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण अर्थात एनएचए आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ म्हणजे एमयूएचएस यांच्यात काल डिजिटल आरोग्य उपक्रमांबाबत सामंजस्य करार करण्यात आला. वैद्यकीय शाखेत डिजिटल आरोग्य शिक्षणाचा समावेश करण्याच्या प्रक्रियेतला हा महत्त्वाचा टप्पा आहे. यामुळे आयुष्मान भारत योजनेची व्याप्ती वाढेल आणि लाखो लोकांना चांगल्या दर्जाची आरोग्यसेवा उपलब्ध होईल असं केंद्रिय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यावेळी म्हणाले. या करारानुसार एमयूएचएस आपला डिजिटल आरोग्य अभ्यासक्रम एनएचए ला देणार असून आयुष्मान भारत डिजिटल अभियानाला गती देण्यासाठी आणखी डिजिटल आरोग्य उपक्रम विकसित करण्यात सहकार्य करणार आहे. हा अभ्यासक्रम डॉक्टर्स आणि आरोग्यसेवा देणाऱ्या सर्वांना डिजिटल आरोग्याबाबतच्या मूलभूत बाबी समजून घेण्यात मदत करेल.
Site Admin | August 14, 2024 9:46 AM | Maharashtra University of Health Sciences | National Health Authority