आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथी शाखांमध्ये 2021-22 पासून शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना नॅशनल एक्झिट टेस्ट अर्थात एन ई एक्स टी देणं अनिवार्य असणार आहे अशी घोषणा केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी काल केली. या संदर्भात विद्यार्थ्यांच्या शंकांचं निरसन करण्याच्या दृष्टीनं स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या शिफारशीनुसार हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी काल नवी दिल्लीत प्रसारमध्यमांशी बोलताना सांगितलं. एक वर्षांची आंतरवासिता अर्थात इंटर्नशीप पूर्ण केल्यानंतर राज्य अथवा राष्ट्रीय स्तरावर परवाना मिळवण्यासाठी तसंच नोंदणी करण्यासाठी ही परीक्षा देणं अनिवार्य राहील.
Site Admin | September 6, 2024 1:21 PM | AYUSH | NExT | Prataprao Jadhav
आयुष मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या वैद्यकशाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आता नॅशनल एक्झिट टेस्ट अनिवार्य
