सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झालेत. त्यामुळे समुद्रकिनारे आणि पर्यटन स्थळ पर्यटकांनी गजबजून गेली आहेत.
गतवर्षीच्या तुलनेत यंदाचा पर्यटन हंगाम तेजीत आहे. त्यामुळे लाखोंची उलाढाल होत आहे. जिल्ह्यातल्या शिरोडा, वेंगुर्ले, देवगड, मालवण या महत्त्वाच्या समुद्रकिनारी पर्यटकांची गर्दी आहे. नाताळ सुट्टी आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी देशभरातून येणाऱ्या पर्यटकांच्या स्वागतासाठी पर्यटन व्यावसायिकांनी जय्यत तयारी केली होती. किनारपट्टी भागाबरोबरच कृषी पर्यटनाकडे देखील पर्यटकांचा यंदा कल दिसून येतोय, त्यामुळे सगळी रिसॉर्ट्स, हॉटेल्स हाऊसफुल आहेत. अपघाताच्या घटना घडू नयेत यासाठी मद्यपी वाहन चालकांवर कारवाईसाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. समुद्रकिनाऱ्यावर लक्ष ठेवण्यासाठी होमगार्ड सागरी सुरक्षा दलाला पोलीस यंत्रणेन मदतीला घेतल आहे.