डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

January 1, 2025 6:58 PM | New Year 2025

printer

राज्यात विविध उपक्रमांनी नववर्षाचं स्वागत

राज्यात विविध उपक्रमांनी नववर्षाचं स्वागत झालं. विविध देवस्थानांवर नागरिकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. शिवसेनेच्या वतीनं ठाण्यात आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहभाग घेत रक्तदान केलं. धुळे जिल्ह्यातही युवक बिरादरी आणि रक्ताशय संस्थेनं गेल्या ४१ वर्षांच्या परंपरेनुसार नववर्षाचं स्वागत करण्यासाठी रक्तदान शिबीर आयोजित केलं होतं. नंदुरबार शहरातल्या श्रॉफ हायस्कुलमधल्या विद्यार्थ्यांनी सामूहिक सूर्य नमस्कार घालून आरोग्य संपन्नतेचा संदेश दिला. सांगलीत काल रात्री लोकहित मंचानं सलग १८ व्या वर्षी “दारू नको दूध प्या” हा अभिनव उपक्रम राबवला.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा