कर विषयक कायदे, आर्थिक जबाबदारी याविषयी जनसामान्यांना साक्षर करुन आर्थिक विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी सनदी लेखापालांनी पुढाकार घ्यावा, असं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं.
‘द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडियाच्या नागपूर शाखेच्या वतीनं आयोजित दोन दिवसीय विदर्भ परिषदेचं उद्घाटन उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. नव्या करप्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणीतून महाराष्ट्राची आर्थिक घोडदौड सुरु आहे. वर्ष २०२८-२९ पर्यंत ५०० ट्रिलियनची अर्थव्यवस्था बनविण्याच्या दृष्टीनं योजनाबद्धरित्या कार्य सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं.