रेल्वे तिकीट आरक्षणाचे नवीन नियम आजपासून लागू झाले आहेत. रेल्वेनं याआधी असलेल्या १२० दिवसांच्या आरक्षण कालावधीत कपात करून तो ६० दिवसांवर आणला आहे. मात्र, ३१ ऑक्टोबरपर्यंत झालेली आरक्षणं कायम राहतील अशी माहिती रेल्वेनं दिली आहे.
६० दिवसांच्या आरक्षण कालावधीमुळे तिकिटांच्या उपलब्धतेच्या शक्यता वाढून त्याचा प्रवाशांना थेट लाभ मिळेल असं रेल्वे प्रशासनानं म्हटलं आहे. ६१ दिवस ते १२० दिवसांच्या कालावधीसाठी केलेली तिकीट आरक्षणे प्रवाशांकडून रद्द करायचं प्रमाण २१ टक्के एवढं होत अशी माहीती रेल्वेनं दिली आहे.