डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

अमेरिकन व्यक्तीशी विवाह केलेल्या परंतु कायदेशीररित्या देशात राहण्याचा अधिकार नसलेल्यांसाठी नवी तरतूद

I अनेक स्थलांतरितांना नागरिकत्व देण्यासंदर्भात एक नवीन तरतूद अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी केली आहे. या तरतुदीमुळे सुमारे पाच लाख नागरिकांना मायदेशी परत पाठवलं जाणार नाही.

 

बायडेन यांनी मांडलेल्या प्रस्तावात अमेरिकेत किमान दहा वर्षे वास्तव्य केलेल्या आणि अमेरिकन व्यक्तीशी लग्न करुन अपत्यांना जन्म देणाऱ्या व्यक्तीला कायमस्वरुपी नागरिकत्व देण्याची शिफारस केली आहे.

 

बायडेन यांचा हा प्रस्ताव त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी मानले जाणारे रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांनी मांडलेल्या प्रस्तावाच्या अगदी विरुद्ध आहे. ट्रम्प यांनी अशा नागरिकांना परत मायदेशी पाठवण्यावर भर दिला होता.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा