इस्रोच्या महत्त्वकांक्षी अवकाश डॉकिंग योजनेची नवीन तारीख लवकरच निश्चित केली जाईल अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी काल दिली.
दोन्ही उपग्रह सुरक्षित असल्याचंही त्यांनी आकाशवाणीला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितलं. सोमनाथ यांनी, नॅव्हिक हे इस्रोचं शंभरावं उपग्रह प्रक्षेपण असून जानेवारीच्या अखेरीस प्रक्षेपण होणार असल्याची माहिती या मुलाखतीत दिली.