नवे फौजदारी कायदे नागरिकांसाठी जीवनसुलभता आणतील असा विश्वास केंद्रीय आणि न्यायमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी व्यक्त केला आहे. ते आज उत्तरप्रदेशात गाझीयाबाद इथल्या सीबीआय अकादमीत बोलत होते. या कायद्यांमुळे न्यायदानाची गती वाढेल, आणि खटल्यांमधे खर्च होणारा सर्व संबंधितांचा वेळ वाचेल, असं ते म्हणाले.
यावेळी ३९ सीबीआय अधिकाऱ्यांना उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपतींचं सेवापदक तसंच गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल भारतीय पोलीस पदक मेघवाल यांनी प्रदान केलं.