डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

नागरिकांना जलद न्याय देण्यासाठी १ जुलैपासून ३ नवे फौजदारी कायदे लागू करण्यात येणार

नागरिकांना जलद, वेळेवर आणि त्रुटिमुक्त न्याय देण्यासाठी देशात येत्या १ जुलैपासून ३ नवे फौजदारी कायदे लागू करण्यात येणार आहेत. देशातील परिस्थिति आणि बदलणाऱ्या कालानुरूप, कायद्यांमध्ये ही सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचं मत केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री अर्जुन मेघवाल यांनी काल कोलकाता इथं व्यक्त केलं. ‘फौजदारी न्याय व्यवस्थेच्या प्रशासनातील भारताचा प्रगतिशील मार्ग’ या विषयावर आयोजित परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते काल बोलत होते.

भारतातील सद्यस्थितीतील अनेक कायदे ब्रिटिशकालीन असून ते बदलण्याची मागणी अनेक स्तरातून केली जात होती. त्यानुसार आता भारतीय न्याय संहिता २०२३, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ आणि भारतीय साक्ष अधिनियम २०२३ हे तींन नवे कायदे येत्या १ जुलैपासून लागू होतील असं मेघवाल यांनी सांगितलं. हे कायदे केंद्र सरकार कोणत्याही सल्ल्याशिवाय घाईघाईने लागू करत आहे हा आरोप मेघवाल यांनी यावेळी फेटाळून लावला. गेल्या चार वर्षांमध्ये सर्व राज्यं, केंद्रशासित प्रदेश, कायदेपालक संस्था आणि कायद्याशी संबंधित सर्व व्यक्ती तसंच नागरिकांचा सल्ला घेण्यात आल्याची माहितीही मेघवाल यांनी दिली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा