डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

नेपाळच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर आरजू राणा देउबा आजपासून पाच दिवसीय भारत दौऱ्यावर

भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांच्या आमंत्रणाचा स्वीकार करून, नेपाळच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर आरजू राणा देउबा यांचं पाच दिवसीय भारत दौऱ्यासाठी आज आगमन होत आहे. नेपाळ हा भारताचा अतिशय महत्वाचा भागीदार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे.  या दौऱ्यात उभय देश एकमेकांना करत असलेल्या सहकार्याचा आढावा घेतला जाणार आहे. उभय देशांचे परराष्ट्र व्यवहार मंत्री नेपाळ-भारत संबंध मजबूत करण्याच्या आणि सहकार्याला चालना देण्याच्या उद्देशानं चर्चा करतील, असं नेपाळच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे.