रोजगारासाठी परदेशी जाणाऱ्या नेपाळी नागरिकांसाठी नेपाळ सरकारने एक त्रिसूत्री सूचनावली प्रसिद्ध केली आहे. म्यानमां, थायलंड, कंबोडिया आणि लाओस या देशांमध्ये रोजगारासाठी जाण्यापूर्वी नेपाळी नागरिकांनी त्यांना रोजगार देणाऱ्या परदेशी कंपन्या आणि संस्थांनी योग्य माध्यमातून व्यवस्थित माहिती घ्यावी अशी सूचना सरकारने केली आहे. आकर्षक मोबदल्याचं अमिष दाखवून परदेशी रोजगारासाठी आलेल्या नेपाळी नागरिकांचा मानवी तस्करी आणि इतर अवैध कामांसाठी वापर केल्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर ही सूचनावली नेपाळ सरकारने जारी केली आहे.
Site Admin | December 24, 2024 3:24 PM | Nepal