नेपाळ-तिबेट सीमा भागात आज सकाळी झालेल्या भूकंपातल्या मृतांची संख्या ९५ वर पोहोचली आहे, तर १३० जण जखमी झाले आहेत. या भूकंपाची तीव्रता ७ पूर्णांक १ दशांश रिक्टर स्केल इतकी होती. नेपाळ सीमेजवळ तिबेट मधल्या झिझांग इथं या भूकंपाचा केंद्रबिंदू होता.
बिहार, पश्चिम बंगाल, सिक्कीमसह उत्तर भारताच्या काही भागातही या भूकंपाचे धक्के बसले. बिहारच्या काही भागात ते तीव्र स्वरूपाचे होते, त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली. यामध्ये अद्याप कोणतीही जीवितहानी अथवा मालमत्तेचं नुकसान झाल्याचं वृत्त नाही.