नेपाळ बस दुर्घटनेत जखमी झालेल्या रुग्णांना काल उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाच्या मदतीने नेपाळहून मुंबईत आणण्यात आलं. यात भुसावळ तालुक्यातल्या वरणगाव इथल्या एकूण ७ जखमी प्रवाशांचा समावेश आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दुपारी या जखमींची बॉम्बे रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. उद्या आणखी ४ जखमींना मुंबई आणण्यात येणार असून त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार करण्यात येणार आहेत. या सर्व जखमींना उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षामार्फत सर्वतोपरी मदत केली जाणार आहे.
Site Admin | August 27, 2024 7:25 PM | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस | वैद्यकीय मदत कक्ष
नेपाळ बस दुर्घटनेतल्या जखमींना उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षामार्फत सर्वतोपरी मदत करणार
