नीट युजी पेपरफुटी प्रकरणी आतापर्यंत काय पावलं उचलली याची माहिती देणारी प्रतिज्ञापत्रं उद्या संध्याकाळपर्यंत न्यायालयात सादर करावीत असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं काल केंद्र सरकार आणि राष्ट्रीय परीक्षा संस्थेला दिले. तसंच या प्रकरणाच्या तपासाचा सद्यस्थिती अहवाल सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयला दिले आहेत. नीटची फेरपरीक्षा घ्यावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेसह विविध ३८ याचिकांवर काल सुनावणी झाली. या प्रकरणाची पुढची सुनावणी येत्या गुरुवारी होणार आहे.