डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

नीट यूजी 2024: राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं नव्यानं दाखल केलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाची नोटीस

नीट यूजी अर्थात, पदवीपूर्व वैद्यकीय प्रवेश पात्रता परीक्षा पेपर फुटीप्रकरणी राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं नव्यानं दाखल केलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयानं आज संबंधित याचिकाकर्त्यांना नोटीस जारी केली. याप्रकरणी काही विद्यार्थ्यांच्या याचिका राजस्थान उच्च न्यायालयापुढे प्रलंबित आहेत. त्या सर्वोच्च न्यायालयाकडे वर्ग कराव्यात, असं राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या याचिकेत म्हटलं आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालयानं, ही नोटीस बजावली आहे. मात्र राजस्थान उच्च न्यायालयापुढच्या प्रलंबित कार्यवाहीला स्थगिती देणारा औपचारीक आदेश जारी करायला सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा