नीट-युजी प्रवेश परीक्षेतल्या गैरप्रकाराची चौकशी करण्यासाठी सीबीआयनं बिहार, गुजरात आणि राजस्थानमधली ५ प्रकरणं हाती घेतली आहेत. सीबीआयनं गुजरात आणि बिहारमध्ये प्रत्येकी एक, तर राजस्थानमध्ये ३ प्रकरणं हाती घेतली असून, महाराष्ट्रातल्या लातूरमधल्या प्रकरणाची चौकशी सीबीआय हाती घेण्याची शक्यता आहे.
बिहार पोलिसांनी दाखल केलेला एफआयआर पेपरफुटी प्रकरणी असून, इतर ४ प्रकरणं तोतया उमेदवार, तसंच उमेदवार, स्थानिक अधिकारी आणि निरीक्षकांचा समावेश असलेल्या फसवणुकीची असल्याचं ते म्हणाले.