नीटपीजी २०२४ ची परीक्षा काल रविवारी देशभरातल्या १७० शहरांमध्ये यशस्वीरित्या पार पडली. यावर्षी २ लाख २८ हजार ५४० उमेदवारांना प्रवेशपत्रे जारी करण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रीय आयुर्विज्ञान परीक्षा मंडळाने दिली आहे. नीटपीजी परीक्षा सुविहित होण्यासाठी १ हजार ९५० हून अधिक स्वतंत्र मूल्यांकनकर्ते आणि ३०० भरारी पाठक सदस्य परीक्षा केंद्रांवर नियुक्त करण्यात आले होते. देशव्यापी परीक्षेच्या संचालनावर देखरेख ठेवण्यासाठी ८ प्रादेशिक नियंत्रण कक्ष देखील स्थापन करण्यात आले होते.
Site Admin | August 12, 2024 10:19 AM | NEET-PG 2024
नीटपीजी २०२४ परीक्षा देशातील १७० शहरांमध्ये यशस्वीरित्या पार
