यंदाच्या नीट अर्थात राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेशी निगडित उच्च न्यायालयांमध्ये प्रलंबित सर्व खटले सर्वोच्च न्यायालयाकडे हस्तांतरित करण्याची मागणी करणाऱ्या राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या याचिकेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं आज संबंधितांना नोटीस बजावली. तसंच सर्वोच्च न्यायालयानं विविध उच्च न्यायालयांमध्ये सुरू असलेल्या नीट संदर्भातल्या सर्व कार्यवाहीला स्थगिती दिली आहे. न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती एसव्हीएन भट्टी यांच्या पीठानं हे निर्देश दिले. या सर्व याचिकांवरची सुनावणी येत्या ८ जुलैला होईल.
Site Admin | June 20, 2024 3:50 PM | NEET Exam