डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

नीरज चोप्रा आणि अविनाश साबळे डायमंड लीग फायनलमध्ये करणार भारताचे प्रतिनिधित्व

ब्रुसेल्स इथं आजपासून सुरू होणाऱ्या डायमंड लीगच्या अंतिम फेरीत भारताचं प्रतिनिधित्व पॅरिस ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा आणि स्टीपलचेस धावपटू अविनाश साबळे करणार आहेत. यंदा डायमंड लीगमधील अलियान्झ मेमोरियल व्हॅन डॅमे स्पर्धेत हे क्रिडापटू विजयासाठी लढत देतील. सध्या 14व्या क्रमांकावर असलेला भारताचा स्टीपलचेसर अविनाश साबळे आज डायमंड लीगच्या अंतिम फेरीत पदार्पण करेल. त्याचा सामना इथिओपियाचे सॅम्युअल फायरवू, गेटनेट वले, केनियाचे आमोस सेरेम आणि अब्राहम किबिवोट यांच्याशी होईल, तर सध्या 14 गुणांसह क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेला नीरज चोप्राचा समाना उद्या पॅरिस ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेता ग्रेनेडाचा अँडरसन पीटर्स आणि जर्मनीचा ज्युलियन वेबर यांच्याशी होईल.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा