डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

भारत आणि संयुक्त अरब अमिराती दरम्यान संरक्षण क्षेत्र आणि सुरक्षा सहकार्य वाढवण्याची गरज-डॉ. एस. जयशंकर

भारत आणि संयुक्त अरब अमिराती दरम्यान संरक्षण क्षेत्र आणि सुरक्षा सहकार्य वाढवण्याची गरज असल्याचं प्रतिपादन परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी काल नवी दिल्ली इथं केलं. संयुक्त अरब अमिरातीचे परराष्ट्र व्यवहार मंत्री शेख अब्दुल्ला बिन झायेद बिन अल नाह्यान यांच्यासोबत झालेल्या 15 व्या भारत-UAE संयुक्त आयोगाच्या बैठकीत डॉ. जयशंकर बोलत होते. एकात्मिक आर्थिक भागीदारीमुळे दोनही देशांचा व्यापार 85 बिलीअन डॉलर्सवर गेला आहे. दोनही देशांदरम्यानचं स्थैर्य, सुरक्षा आणि समृद्धी जपणं हे दोनही देशांच्या समृध्दीसाठी आवश्यक असल्याचंही ते म्हणाले.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा