संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं जम्मू काश्मीरमधल्या पहलगाम हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. जागतिक शांततेसाठी दहशतवाद हा मोठा धोका असून सगळ्या प्रकारच्या दहशतवादाचा मुकाबला करण्याची गरज आहे, असं परिषदेच्या सदस्यांनी म्हटलं आहे.
पहलगाम हल्ल्याचे गुन्हेगार, समर्थक आणि प्रायोजक यांना शिक्षा देण्याचं आवाहन त्यांनी केलं. या प्रकरणी सर्व देशांनी आंतरराष्ट्रीय कायद्यांतर्गत सहकार्य करावं, असं आवाहनही त्यांनी केलं. आपली संघटना परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून असल्याचं संयुक्त राष्ट्रांचे प्रवक्ते स्टीफन दुजारीक यांनी सांगितलं.