खटल्यांचा जलद निपटारा करण्यासाठी देशभरातल्या सर्व न्यायालयं आणि न्यायाधिकरणांमधे उत्तम पायभूत सुविधांची गरज सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी व्यक्त केली आहे. ते आज मुंबईत रोखे अपीलीय न्यायाधिकरणाच्या नव्या कार्यालयाचं उद्धाटन केल्यानंतर दूरदर्शनशी बोलत होते. प्रत्यक्षातल्या तसंच आभासी माध्यमातून होणाऱ्या कामकाजासाठीही या सुविधांची गरज आहे, असं त्यांनी सांगितलं. गेल्या काही वर्षात भांडवली बाजाराचा बहुस्तरीय विस्तार झाला आहे. हे लक्षात घेता गुंतवणूकदारांचं हितरक्षण करण्यासाठी न्यायाधिकरणाच्या अतिरिक्त शाखा असणं आवश्यक आहे, असंही ते म्हणाले.
Site Admin | July 4, 2024 3:15 PM
‘खटल्यांचा जलद निपटारा करण्यासाठी न्यायालयं आणि न्यायाधिकरणांमधे उत्तम पायभूत सुविधांची गरज’
